अनन्या पांडेसोबत स्क्रिन शेअर करणार ईशान खट्टर


लवकरच अनन्या पांडेसोबत आगामी चित्रपटात ‘धडक’ फेम अभिनेता ईशान खट्टरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याचवर्षी ‘स्टूडंट ऑफ द ईयर २’ चित्रपटातून अनन्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिच्या या चित्रपटातील अभिनयाची कलाविश्वात प्रशंसाही होत असल्यामुळेच अनन्याला आगामी चित्रपटांसाठी ऑफर्स देण्यात येत आहेत. ती आता ईशान खट्टर सोबतदेखील भूमिका साकारताना दिसणार आहे.

आगामी ‘काली पीली’ या चित्रपटात ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची जोडी झळकणार आहे. सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचेही म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर हे करणार आहेत. अनन्या सध्या कार्तिक आर्यनसोबत ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर लगेच ती ‘काली पीली’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होईल.

दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘अ सुटेबल बॉय’मध्ये ईशान खट्टर देखील काम करत आहे. तो ‘धडक’ चित्रपटानंतर पडद्यावर झळकला नाही. पण तो आता अनन्यासोबत ‘काली पीली’मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment