तुम्ही पाहिला आहे का सोनमच्या झोया फॅक्टरचा टीझर ?


आगामी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात बॉलीवूडची स्टाईल आयकॉन अर्थात अभिनेत्री सोनम कपूर झळकणार आहे. ती वेगळ्या भूमिकेत या चित्रपटात दिसेल. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरवरुन याचा प्रत्यय येतो. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करण्यात आला आहे.

पंकज धीर यांच्यापासून या ४१ सेकंदाच्या टीझरची सुरुवात होते. ते यात लकी चार्म म्हणून जोया कवच विकताना दिसतात. यात हे कवच चांगल्या नशीबासाठी विक्री करण्याच्या अनेक जाहिराती पाहायला मिळतात. सोनमचा क्रिकेटच्या देवीच्या लूकमधील फोटो या कवचमध्ये पाहायला मिळतो.


या टीझरवरुन एवढे मात्र नक्की आहे, की हा चित्रपट एक वेगळा आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा टीझर शेअर करत सोनमने याला एक खास कॅप्शन दिले आहे. माझ्या यशस्वी होण्यामागे काही रहस्य नाही. ही सगळी तर जोया कवचची जादू असल्याचे तिने यात म्हटले आहे. दरम्यान सलमान दुलकरही महत्त्वाच्या भूमिकेत या चित्रपटात असणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment