या कारणामुळे विवेक ओबेरॉय सोशल मीडियावर ट्रोल

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला होता. आता या घटनेवर चित्रपट बनणार आहे. हिंदींसह तामिळ आणि तेलुगू या तीन भाषेत ‘बालाकोट – द ट्रु स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. विवेक ओबेरॉयने या चित्रपटाची घोषणा करताच तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.

https://twitter.com/sagarcasm/status/1164791354582417409

एका युजरने लिहिले की, विवेक ओबेरॉय अक्षय कुमार बनण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यात यश मिळत नाहीये. कारण अक्षय कुमार जोरजोरात ओरडून आपली स्क्रिप्ट सर्वांना सांगत नाही.

दुसऱ्या युजरने लिहिले की, सर्वांना वाटत होते, अक्षय कुमार किंवा जॉन अब्राहम करेल. मात्र येथे तर विवेक ओबेरॉयने बाजी मारली. तर एका युजरने लिहिले की, राहू दे भाऊ. मोदींजींच्या चित्रपटाची काय वाट लावली होतीस ती आजही आम्हाला आठवते. दया कर भाऊ दया कर.

अमेरिकेत आयोजित इंडिया डे परेडमध्ये विवेक ओबेरॉय सहभागी झाला असून, त्याला तेथे पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटासाठी चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. यामुळेच त्याने पुढील चित्रपट बालाकोट एअर स्ट्राइक करण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटाचे शुटिंग जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा येथे होईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत शुटिंग सुरू होणार आहे.

Leave a Comment