नोरा-विकी म्हणत आहेत बडा पछताओगे


उरी-द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेता विकी कौशल याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर विकी आता एका अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

विकीसोबत बडा पछताओगे असे शीर्षक असलेल्या या गाण्यात नोरा फतेहीदेखील आहे. या गाण्याला अरिजीत सिंगने आवाज दिल असून हे एक भावनिक गाणे आहे. या गाण्यात जोडीदार म्हणजेच विकीपासून लपून एका दुसऱ्या मुलाला डेट करणाऱ्या नोराची कथा आणि या सर्वात विकीची होणारी घालमेल पाहायला मिळते.

यात अनेकदा डान्समधूनच प्रेक्षकांसमोर येणाऱ्या नोराचा आणि विकीचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला वेगळा लूक पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ विकीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत हे आपले पहिले अल्बम साँग असल्याचे म्हटले आहे. आता विकीचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment