वकिली करता करता राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा जीवनप्रवास


आज 24 ऑगस्ट रोजी 12 वाजून 7 मिनिटांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली हे प्रदीर्घ काळ प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही त्यांच्यावर करण्यात आली होती. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात 9 ऑगस्टपासून अरूण जेटली यांना दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर वेगवेगळ्या विभागांच्या डॉक्टरांचे पथक उपचार करत असल्याचे एम्सकडून सांगण्यात आले होते. तसेच त्यांची प्रकृती ‘हीमोडायनॅमिकली स्टेबल’ असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. ‘हिमोडायनॅमिकली स्टेबल’ असण्याचा अर्थ आहे की हृदय एवढी ऊर्जा तयार करू शकते की रक्ताला धमनीमध्ये ते योग्यप्रकारे पाठवू शकते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहचत राहतो. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे जेटलींना रुग्णालयात दाखल केले गेले होते.

त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्षवर्धन त्यांना पाहण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील यापूर्वीच्या सरकारमध्ये 66 वर्षीय अरूण जेटली अर्थमंत्री होते. त्यांची किडनी ट्रान्सप्लांट (मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रीया) करण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावरील जबाबदाऱ्या पियूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आल्या होत्या.

ते याच वर्षी फेब्रुवारीमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी देशाबाहेर गेले होते, त्यामुळे ते अंतरिम अर्थसंकल्प सादर करू शकले नव्हते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मे महिन्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानांना त्यांनी पत्र लिहून कळवले होते की ते आरोग्याच्या कारणांमुळे नव्या सरकारमध्ये कोणतीही जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत.

आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं होते की ते गेल्या 18 महिन्यांत आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त आहेत ज्यामुळे ते कोणतेही पद घेऊ इच्छित नाहीत. वकिली करता करता राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये समावेश होतो. ते दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिले असून सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.

एकाच वेळी वेगवेगळ्या आजारांनी अरुण जेटली त्रस्त आहेत. एकाच वेळी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा सामना जेटलींना करावा लागत आहे. त्यांनी 2014 मध्ये अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बॅरियाट्रिक सर्जरी केलेली आहे. मे 2018 मध्ये एम्समध्ये अरूण जेटली यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. यावर्षी जानेवारीमध्ये जेटली यांची अमेरिकेत सॉफ्ट टिश्यू कॅन्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती लाईव्ह मिंट या संकेतस्थळाने दिली आहे

सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होणे हा प्रकार दिसून येत आहे. जवळपास 40 टक्के मधुमेहग्रस्त रुग्णांमध्ये किडनीवर परिणाम होत असल्याचे आढळून येत असल्याचे फर्स्टपोस्ट या संकेतस्थळावरील एका बातमीत म्हटले आहे. या प्रकाराला डायबेटिक नेफ्रोपॅथी असे म्हटले जाते. एकाच वेळी अनेक आजार होण्याच्या या प्रकाराला मल्टिमोर्बिडिटी असे म्हटले जाते. या प्रकाराचा अर्थ असा आहे की एका आजारातून पुढे अनेक आजार किंवा व्याधी उद्भवणे. मल्टिमोर्बिडिटी किंवा अनेक व्याधी एकाचवेळी अस्तित्वात आल्यास त्या व्यक्तीवर उपचार करणे हे अवघड होऊन जाते. कारण रुग्णाला वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळे उपचार घ्यावे लागतात आणि त्यातून ड्रग इंटरएक्शन्स आणि साईड इफेक्टची प्रमाण वाढण्याचा धोका असतो.

‘एम्स’ भोपाळचे डॉक्टर रजनीश जोशी यांच्या ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, भारतामध्ये दीर्घकालीन आजाराने ग्रस्ता असलेले दोन तृतीयांश रुग्ण हे अनेक व्याधींना बळी पडल्याचे आढळून येते. यांपैकी बहुतेक जणांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्हीही व्याधी एकाच वेळी जडलेल्या दिसून येतात.

Leave a Comment