सोशल मीडियावर सध्या एका कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही विचारात पडाल. हा कावळा किती समजुतदारपणे प्लॅस्टिकची बॉटल कचऱ्याच्या कुंडीत टाकत आहे.
video ; या कावळ्याकडून घ्या स्वच्छतेचे धडे
आजही अनेक लोक कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याच्या ऐवजी कुठेही रस्त्यावर टाकून देतात. अनेक ठिकाणी कचऱ्यांचा ढिग जमा होतो. त्यातच आता हा कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
If they can,
We all can👍🏻 pic.twitter.com/JDtIxWKAqZ— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 22, 2019
व्हिडीओमध्ये दिसते की, कशाप्रकारे कावळा प्लॅस्टिकची बॉटल कचऱ्याच्या कुंडीत टाकत आहे. या कावळ्याने लोकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मेसेज दिला जात आहे की, जर कावळा करू शकतो तर तुम्ही का नाही ?
या व्हिडीओ आतापर्यंत 15 हजारपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. तर हजारोंनी लाईक्स केले आहे. या व्हिडीओद्वारे सांगितले जात आहे की, कचरा रस्त्यावर फेकू नये.
What a beautiful message for humans! pic.twitter.com/wTgK4b9uGF
— Dr. S.Y. Quraishi (@DrSYQuraishi) August 1, 2019
काही दिवसांपुर्वी देखील एका माकडाचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते माकड नळ सुरू करून पाणी पिते व पाणी पिल्यावर नळ बंद करते. त्या व्हिडीओतून पाणी वाचवण्याचा मेसेज दिला जात होता.