पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार रितेश देशमुख


रितेश देशमुख आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनी एक व्हिलन या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली होती. त्या चित्रपटात रितेश आणि सिद्धार्थने जबरदस्त व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. आता हिच जोडी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. आागामी मरजावाँ या चित्रपटात त्यांचा पुन्हा एक जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर खूप प्रतीक्षेनंतर रिलीज करण्यात आले आहे.


हा एक थरारक अनुभव देणारा चित्रपट ठरु शकेल असे प्रसिध्द झालेल्या पोस्टरवरुन वाटते. सिध्दार्थ या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला असून त्याच्या मागे दशमुखी रावणाची प्रतीमा दिसते. या साठी दिलेली टॅगलाईनदेखील आकर्षक आहे. पोस्टरवर ‘इश्क में मरुंगा भी, मारुंगा भी’, असे लिहिले आहे.


रितेश देशमुखचा नवा अवतार दुसऱ्या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. तो यात बुटका दिसत असून हातामध्ये बंदुक घेऊन आत्माविश्वासाने चालताना दिसतो. दशमुखी रावणाची प्रतिमा त्याच्या मागेही दिसते. ‘कमिनेपण की हाईट तीन फुट’ अशी या पोस्टरची टॅगलाईन आहे.


रितेश देशमुख तिसऱ्या पोस्टरमध्ये प्रेतांच्या पडलेल्या खचातून रक्तबंबाळ होऊन चालताना दिसतो आहे. याला मैं मारुंगा मर जायेगा, दुबारा जनम लेने से डर जायेगा, अशी टॅगलाईन आहे. २२ नोव्हेंबर रोजी ‘मरजावाँ’ हा चित्रपट रिलीज आहे. मिलाप जव्हेरी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Comment