Video : पक्षी आहे की ससा ? ओळखूनच दाखवा


सोशल मीडियावर कधी कधी अशा गोष्टी व्हायरल होत असतात की, त्यांना बघून कळत नाही की हे नक्की आहे तरी काय ? एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही देखील विचारात पडाल की, हा नक्की पक्षी आहे की ससा ?

पहिल्यांदा व्हिडीओ बघून असे वाटते की, ती व्यक्ती कावळ्या सारख्या दिसणाऱ्या पक्षाच्या डोक्यावर हात फिरवत आहे. मात्र तुम्ही जर लक्षपुर्वक ध्यान देऊन व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, तो कावळा नसून काळ्या रंगाचा ससा आहे.


सशाने आपल्या कानांना अशाप्रकारे वरती केले आहे की, जसे ती पक्ष्याची चोचच आहे. नॉर्वेच्या ओस्लो विश्वविद्यालयातील एक संशोधक डँन क्विंटानाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ट्विटरवर पोस्ट करताना त्याने लिहिले की, सशाला प्रेमाने नाकावर हात फिरवत आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 80 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. तर 15 हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हिडीओ बघून तुमच्या लक्षातच येणार नाही की हा ससा आहे की पक्षी ?

Loading RSS Feed

Leave a Comment