जरा जपूनच पहा छिछोरेचा नवा ट्रेलर


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या आगामी छिछोरे या चित्रपटाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर फ्रेंडशिप डे च्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. कॉलेजच्या मित्रांची मस्ती ज्यात दाखवण्यात आली होती. या ट्रेलरला फॅन्स आणि प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली होती. छिछोरे चित्रपटाचा नवा ट्रेलर आता तुमच्या भेटीला आला आहे. जो पाहण्याआधी हेडफोन लावण्याची सूचना देण्यात आली आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतरच हेडफोनची गरज काय याचे महत्व कळेल.

एक मिनिट ५६ सेकंदांचा छिछोरे चित्रपटाचा नवीन दोस्त स्पेशल ट्रेलर आहे. कॉलेजपासून याची सुरूवात होते. ज्यात याच्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या जातात. त्यासोबतच हेडफोन लावून ट्रेलर बघण्याची ताकिद दिली आहे. कारण हा ट्रेलर एडल्ट जोक्सने भरलेला आहे. कॉलेजच्या मित्रांची छिछोरेपंती यात दाखवण्यात आली आहे. सुशांत-श्रद्धा याव्यतिरिक्त वरूण शर्मा, प्रतीक बब्बर, ताहिर राज भसीन, नवीन पोलिशेट्टी, तुषार पांडे आणि सहर्ष कुमार शुक्ला नव्या ट्रेलरमध्ये दिसणार आहेत.

काही कॉलेजच्या मित्रांची कहाणी चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. यात सर्व कलाकारांचे दोन लूक आहेत. एकात ते कॉलेज स्टूडेंट्स आणि दुसऱ्यात ते वृद्ध वयात दाखवण्यात आले आहेत. ९०च्या दशकातला कॉलेज लूक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

३० ऑगस्टला छिछोरे याआधी रिलीज होणार होता. पण याच दिवशी श्रद्धाचा दुसरा चित्रपट साहो देखील रिलीज होणार होता. प्रभास- श्रद्धाचा साहो याआधी १५ ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलून ३० ऑगस्ट करण्यात आल्यामुळे साहोला टक्कर देण्यासाठी छिछोरेचे तारीख एक आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे येत्या ६ सप्टेंबर २०१९ ला छिछोरे चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment