‘तारक मेहता..’मध्ये नव्या सोनू भिडेचे आगमन


छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असलेल्या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत आता एका नवीन अभिनेत्रीचे आगमन होणार असून पलक सिधवानी असे या अभिनेत्रीचे नाव आहे आणि ती यापुढे आत्माराम आणि माधवी भिडे यांची कन्या म्हणजेच सोनू भिडेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही व्यक्तिरेखा याआधी अभिनेत्री निधी भानूशाली साकारत होती. पण तिन उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याचे कारण देत या व्यक्तिरेखेला कायमचा रामराम ठोकला होता.


निर्माते सोनूची भूमिका साकारण्यासाठी एका नवीन अभिनेत्रीच्या शोधात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात रंगल्या होत्या. पण त्या निर्मात्यांनी सातत्याने फेटाळून लावल्या होत्या. पण पलक सिधवानीचे नाव जाहिर झाल्यानंतर त्या चर्चा खऱ्या होत्या असे निर्मात्यांनी मान्य केले आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सोनू ही सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखेंपैकी एक असून निर्मात्यांनी या भूमिकेसाठी गेल्या सहा महिन्यात शेकडो मुलींचे ऑडीशन घेतले होते. पलक सिधवानीची निवड त्या शेकडो मुलींमधून करण्यात आली आहे.

View this post on Instagram

Trying to be positive all this while!💫

A post shared by Palak Sidhwani (@palaksidhwani) on


याआधी काही टीव्ही जाहिराती व लघुपटांमध्ये मी काम केले होते. पण त्यांचे स्वरुप फार लहान होते. माझ्या कारकिर्दीतील तारक मेहता ही सर्वात मोठी संधी असून मी त्यासाठी लागणारी मेहनत करेन आणि संधीचे सोने करेन, असे मत पलक सिधवानीने व्यक्त केले आहे.

Leave a Comment