भुयारात दयनीय अवस्थेत सापडली जगप्रसिद्ध पॉर्न स्टार


जेनी ली ही एकेकाळी जगभरात पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्ध होती. पण तिच पॉर्नस्टार सध्याच्या घडीला एका एका भुयारात दयनीय परिस्थितीत आयुष्य जगत असल्याची बाब समोर आली आहे. जेनी ली उर्फ स्टीफनी सॅडोरा हिला एका भुयारातून एका टीव्ही चॅनलने शोधून काढले. स्टीफनी आता 37 वर्षांची झाली असून येथे राहत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. स्टीफनीची ओळख ही काही वर्षांपूर्वी जगभरातील यशस्वी पॉर्नस्टारच्या रुपात झाली होती.

एक टीव्ही चॅनलची टीम लास वेगास येथील भुयारांवर डॉक्युमेंट्री बनवत होते. त्यांची त्यावेळी अचानक स्टेफनी हिच्यासोबत येथील एका भुयारात हिची भेट झाली. येथे शहरात येणाऱ्या पुरापासून वाचण्यासाठी भुयारे बनवण्यात आली आहेत. बेघर झालेली लोक त्यामध्ये राहत आहेत. जवळजवळ 300 लोक 320 किमी लांब अशा भुयारात राहत असून बहुतांश जण ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. स्टेफनी हिचा ड्रग्जबाबत 119 वा क्रमांक आहे.

एका वेबसाईटवर स्टेफनी हिचे अजूनही 45 हजार सब्सक्राइबर्स आहेत. पण तिला लास वेगस सारख्या श्रीमंत देशात एका भुयारात रहावे लागत आहे. तसेच स्टेफनी हिला आता या भुयारातून बाहेर यायचे नाही असे सुद्धा तिने म्हटले आहे. स्टेफनी हिचे असे म्हणणे आहे की, मी ज्या भुयारात राहत आहे तेथे मला सर्वकाही मिळत आहे. तसेच आपलेपण येथील लोकांमध्ये असून काहीजण माझे जीवाभावाचे मित्र बनले आहेत. परंतु स्टेफनी नेमक्या कोणत्या कारणामुळे येथे राहण्यास मजबूर आहे हे स्पष्ट झालेले नाही.