चिदंबरम यांच्याआधी या दिग्गज नेत्यांना देखील झालेली आहे अटक


सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात अखेर बुधवारी रात्री माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली. एखाद्या मोठ्या नेत्याला अटक झालेले हे पहिले प्रकरण नाही. याआधी देखील अनेक नेत्यांना अटक झाल्याने राष्ट्रीय राजकारणात भुकंप आला होता. जाणून घेऊया अशीच काही प्रकरण –

पुल निर्माण घोटाळ्यात करूणानिधी यांना अटक –
जुलै 2001 मध्ये डीएमके पक्षाचे प्रमुख यांना त्यांच्या घरातून रात्री दोन वाजता अटक केली होती. चेन्नईमधील पुल निर्माण प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते.

चारा घोटाळा-लालू प्रसाद यादव –
रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली होती. लालू प्रसाद यांच्याबरोबर 50 जणांना चारा खरेदीमध्ये खोटी बिलं आणि वाउचरचा वापर करत 37 करोड रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप होता.

शस्त्रास्त्रे करारात बंगारू लक्ष्मण यांना अटक –
भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना तहलकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना सापडले होते. हे प्रकरण शस्रास्र खरेदी करण्याचे होते. 2012 मध्ये दिल्लीच्या सीबीआय न्यायालयाने त्यांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली.

2 जी घोटाळ्यात ए राजा यांना अटक –
युपीए सरकारच्या काळात दुरसंचार मंत्री असणाऱ्या ए राजा यांना 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या फेब्रुवारी 2011 मध्ये अटक करण्यात आली होती.

टेलीकॉम घोटाळ्यात सुखराम यांना अटक –
पीवी नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये दुरसंचार मंत्री असणाऱ्या सुखराम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. सीबीआयने 1996 मध्ये त्यांच्या घरात लपवलेले 3.6 करोड रूपये जप्त केले होते. 2002 मध्ये त्यांना दोषी ठरवत दिल्ली उच्च न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांनंतर 2011 ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवत त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली.

भूमी घोटाळ्यात येडियुरप्पा यांना अटक –
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस युडियुरप्पा यांना सरकारी भूमी घोटाळ्यात जेलमध्ये जावे लागले होते.

कॉमनवेल्थ घोटाळ्यात सुरेश कलमाडी यांना अटक –
25 एप्रिल 2011 मध्ये कॉमनवेल्थ घोटाळ्यात सीबीआयने सुरेश कलमाडी यांना अटक केली होती. दिल्लीच्या जेलमध्ये 9 महिने काढल्यानंतर त्यांना 2012 मध्ये तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले.

नोट फॉर वोट प्रकरणात अमर सिंह यांना अटक –
राज्यसभा खासदार आणि माजी समाजवादी नेते अमर सिंह यांना 2011 मध्ये नोट फॉर वोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. अमर सिंह यांच्याबरोबर दोन अन्य आरोपींना देखील अटक करण्यात आली होती.

Leave a Comment