Video : हा भन्नाट कॅच बघून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही


क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक कॅच बघितले असतील जे अशक्य असताना देखील खेळाडूंनी पकडले. मात्र एका खेळाडूने मुलाखत देत असतानाच, असा कॅच पकडला आहे, ज्याने सर्वांनाच हैराण केले आहे. बघणाऱ्याला स्वतःच्या डोळ्यावर बसत नाहीये. खेळाडू ग्राउंडवर मुलाखत देत होता. अचानक मागून जोरात बॉल येतो आणि खेळाडू आश्चर्यकारकरित्या तो बॉल पकडतो देखील. सर्रे काउंटी क्रिकेट क्लबचे रिक्की क्लार्क अॅशेस सिरीजबद्दल मुलाखत देत होते.


व्हिडीओमध्ये दिसते की, कँमेरामन आणि मुलाखत घेणारी व्यक्ती बॉल आपल्याकडे येत आहे हे बघून घाबरतात. मात्र क्रिकेटर लगेच मागे बघतो आणि एका हाताने बॉल पकडतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार माइकल वॉनने देखील या जबरदस्त कॅचची तारीख केली. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, आजपर्यंतचा सर्वात शानदार कॅच. तर काही लोकांनी हा कॅच फेक आणि स्क्रिपटेड असल्याचे सांगितले.

रिक्की क्लार्क इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आहे. त्याने इंग्लंडकडून 2 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने आणि 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 21 वर्षांचा असताना त्याने पहिल्याच सामन्यात पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती. मात्र नंतर खराब प्रदर्शनामुळे त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड झाली नाही. रिक्कीच्या नावावर विश्व विक्रम देखील आहे. त्याने 2011 मध्ये फर्स्ट क्लास मॅचमध्ये 7 कॅच पकडले होते.

Leave a Comment