Video : अपील करता करता अचानक पडला गोलंदाज


क्रिकेटच्या सामन्यादरम्यान अनेक घटना अशा घडतात की, ते बघून आपण हसू रोखू शकत नाहीत. काउंटी चँम्पियनशीपच्या डिव्हिजन -2 मधील ससेक्स आणि मिडिलसेक्स सामन्यादरम्यान अशीच मजेशीर घटना घडली. फलंदाजच्या विरोधात एलबीडब्ल्यूची अपील करत असताना गोलंदाज अचानक मागे सरकत असताना कोसळला. मैदानावर उपस्थित खेळाडू, प्रेक्षक सर्वच जणांना तो प्रसंग बघून हसायला आले.

या घटनेचा व्हिडीओ काउंटी चँम्पियनशीपच्या फेसबूक पेजवर पोस्ट करण्यात आला. ससेक्सचा गोलंदाज टॉम हेंसने जेम्स हँरिसविरोधात एलबीडल्ब्यूची जोरदार अपील केली. ही अपील करत असतानाच त्याचे संतूलन गेले व तो खाली पडला. अंपायरने त्याची अपील देखील नाकारली व फलंदाजाला नाबाद घोषित केले.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरला झाला. अनेक युजर्सनी यावर मिम्स देखील शेअर केले.

ससेक्सने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. टॉम हेंस या सामन्यात काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने दोन्ही डावात 5 आणि 11 धावा केल्या. तर दोन्ही डावात एकएक विकेट घेतली.