बॉलीवूडच्या डर्टी गर्लला करायचे आहे या अभिनेत्यासोबत काम


किंग ऑफ रोमान्स अशी बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानची ओळख आहे आणि त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी अशी अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. त्यातच आता नुकताच रिलीज झालेल्या मिशन मंगल या चित्रपटातून चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विद्यानेही अशीच काहीशी इच्छा व्यक्त केली आहे. शाहरुखसोबत आतापर्यंत केवळ दोन गाण्यांमध्ये विद्या बालन झळकली आहे.

ती आपल्या १४ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकदाही शाहरुखसोबत चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसली नाही. पण हे कलाकार दोन गाण्यात एकत्र झळकले आहेत. यात ओम शांती ओममधील दिवानगी आणि हे बेबीमधील शाहरुखचा स्पेशल अपीरियन्स यांचा समावेश आहे. विद्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली, पहिल्यांदा मी जेव्हा शाहरुखला भेटली तेव्हा माझ्या पाया खालची जमीनच सरकली होती. शाहरुखची पर्सनालिटी खूपच चार्मिंग आहे. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाली, तर आपल्याला शाहरुखसोबत काम करायला आवडेल, असे ती म्हणाली.

Leave a Comment