गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेटफ्लिक्सच्या आगामी सिरीजचा ट्रेलर आला आहे. नेटफ्लिक्स आणि शाहरूख खानच्या रेड चिलीस इंटरटेंनमेंटच्या अंतर्गत बनलेला ‘बार्ड ऑफ ब्लड’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिरीजमध्ये अभिनेता इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
ट्रेलर एकदम धमाकेदार आणि अँक्शन पँक आहे. या सिरीजमध्ये इम्रान हाश्मी एका एक्स रॉ स्पाय एजेंटची भूमिका साकारत आहे. हा एजेंट आता एका शाळेत स्कूल टीचर आहे.भारताचे चार स्पाय एजेंट पाकिस्तानमध्ये पकडले गेल्यानंतर कबीर अर्थात इम्रान हाश्मी आणि दोन जण सिक्रेट मिशनवर जातात.
इमरान हाश्मीच्या पहिल्या वहिल्या वेबसिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Where can we sign up to get interrogated by @iamsrk? pic.twitter.com/L8vGhO5hFr
— Netflix India (@NetflixIndia) August 22, 2019
इम्रान हाश्मीबरोबर या सिरीजमध्ये ‘मेड इन हेवन’ सिरीजमधील अभिनेत्री शोभिता धूलिपाला आणि ‘मुक्काबाज’ अभिनेता विनीत कुमार सिंह देखील दिसणार आहे. याचबरोबर कीर्ति कुल्हारी, जयदीप अहलावत, शशांक अरोरा आणि अमायरा दस्तूर हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.
‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेब सिरीज 27 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिरीजचे दिग्दर्शन ऋभु दासगुप्ताने केले असून, लेखक बिलाल सिद्दीकीच्या बार्ड ऑफ ब्लड या पुस्तकवर सिरीज आधारीत आहे. हे पुस्तक 2015 मध्ये प्रकाशित झाले होते.
I spy with my little eye a first look at @emraanhashmi in #BardOfBlood. Coming soon. pic.twitter.com/ifKFaj1iFe
— Netflix India (@NetflixIndia) July 6, 2019
याआधी शाहरूख खानने या वेब सिरीजचे काही टिझर रिलीज केले होते.