‘झिरो’ चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान झळकला नाही. आगामी कोणत्याही चित्रपटाची घोषणाही त्याने केली नसल्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या सोशल मीडियात शाहरुखचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शाहरुख यामध्ये आपल्या नव्या कामासंबधी बोलताना दिसत आहे.
किंग खान वाट पाहतो आहे ‘त्या’ फोनची वाट!
Still waiting on that callback, @iamsrk. pic.twitter.com/JJygsX9Wfw
— Netflix India (@NetflixIndia) August 19, 2019
शाहरुखचा हा व्हिडिओ नेटफ्लिक्सच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. शाहरुख या व्हिडिओमध्ये कोणाशी तरी फोनवर काम मागताना दिसतो. पण, हे काम कोणत्याही चित्रपटासाठी नव्हे तर इंटेलिजंन्स एजन्सीसाठी असल्याचे त्याला कळते. तो त्याबद्दल आणखी विचारण्याचा प्रयत्न करतो, पण, तो फोन मध्येच कट होतो. आता याबद्दलची आणखी माहिती २२ ऑगस्टला मिळेल, असेही या व्हिडिओतून स्पष्ट होते.
सध्या चित्रपटांपासून शाहरुख जरी लांब असला, तरी सध्या तो नेटफ्लिक्सच्या २ प्रोजेक्टची निर्मिती त्याच्या रेड चिलीज अंतर्गत करत आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून एक हॉरर वेबसीरिज ‘बेतान’ आणि इमरान हाश्मीची थ्रिलर ‘बार्ड ऑफ ब्लड’ची निर्मिती होत असल्यामुळे शाहरुख पडद्यामागून चाहत्यांसाठी आणखी काहीतरी सरप्राईझ घेऊन येणार की काय, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.