अन् अमेरिकेतील गाद्या उडू लागल्या अचानक हवेत


अमेरिकेत खुल्या मैदानामध्ये चित्रपट बघण्यासाठी जमलेल्या लोकांना अशा गोष्टींचा सामना करावा लागला की, सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहे. अमेरिकेतील कोलोराडो येथे ‘बेड सिनेमा’ म्हणजेच खुल्या मैदानावर लोकांना चित्रपट बघण्यासाठी गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अचानक जोरदार वारे आल्याने, त्या गाद्या अक्षरशः हवेत उडू लागल्या.

सोशल मीडियावर या गाद्या उडतानाचा व्हिडीओ एका युजरने शेअर केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला. रॉब मेन्स याने हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करताना लिहिले की, 2019 मधील गाद्यांचे हे सर्वात मोठे स्थलांतर आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी बघितला असून, त्यावर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. ‘बेड सिनेमा’ या गुरूवात ते रविवारी होणाऱ्या इव्हेंटसाठी या गाद्या ठेवण्यात आल्या होत्या.


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हे हास्यास्पद असल्याचे म्हटले. तर काहींनी चित्रपट बघायला आलेल्या लोकांबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment