वीज चमकत असताना आणि आकाशात गडगडाट होत असताना आपल्याला नेहमी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात असतो. हाच सल्ला अमेरिकेमधील साउथ कॅरोलिना या व्यक्तीने ऐकला नाही व त्याला एका विचित्र अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले.
Video : याला म्हणतात वेळ आली होती पण काळ आला नव्हता
आकाशातून वीज कोसळताना तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल, मात्र एखाद्या व्यक्तीवर वीज कोसळल्यानंतरही तो जिंवत राहिला असे ऐकले आहे का अशीच घटना अमेरिकेचे साउथ कॅरोलिना येथे एका व्यक्तीबरोबर घडली.
Cameras caught my crazy experience with lightning. Supa thankful to have been able to motor scoot out of there without major injures
Posted by Romulus McNeill on Friday, August 16, 2019
काउंसलर रोमुलुस मॅकनिकल पाऊस असल्याने छत्री घेऊन शाळेत जात होते. याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. वीज छत्रीला स्पर्शकरून निघून गेली व त्यामुळे त्या व्यक्तीचे सुदैवाने प्राण वाचले. रोमुलुस मॅकनिकल या घटनेचा अनुभव फेसबूकवर शेअर केला.
सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तो शेअर केला. अनेक युजर्संनी ते व्यवस्थित आहे का याबद्दल विचारले तर काहींनी ही घटना अदभूत असल्याचे म्हटले आहे. काही युजर्सनी तर त्यांच्याकडे सुपर पॉवर असल्याचे देखील म्हटले.
रोमुलुस यांनी सांगितले की, या घटनेमुळे ते खूप घाबरले. वीजेचा झटका खूप जोरात होता. घडलेली घटना खूपच विचित्र असल्याचे देखील त्यांनी म्हटले.