Video : हिमनग ढासळल्याने आलेल्या लाटेत नाविकांचे वाचले प्राण


अलास्का येथील ग्लेशियर अचानक ढासळल्याने अचानक आलेल्या लाटेत दोन कायागिंक (छोटी नाव) करणाऱ्यांचे प्राण वाचले आहेत. जोश बास्ट्रयर आणि एंड्र्यू हुपर दोघांचेही युट्यूब चॅनेल आहे.

दोघेही कायागिंक करत असताना, अचाचन ग्लेशियर ढासळले. व्हिडीओमध्ये दिसून येते की, अचानक बर्फ ढासळल्याने मोठी लाट तयार होते. ती लाट दोघांच्याही अंगावर येते.

‘ओह माय गॉड, ते बघ,  आपण भाग्यवान आहोत की आपण जिंवत आहोत’, असे बास्ट्रयर व्हिडीओमध्ये ओरडत आहे.

हुपरने सांगितले की, ‘सुरूवातील अगदी छोटेछोटे भाग पडत होते. त्यानंतर अचानक मोठा भाग ढासळला आणि अचानक पुर्णच कोसळले.  आम्ही त्याच्या खूप जवळ होतो.’ ‘ते पडताना बघणं खरंच थरारक अनुभव होता. सुदैवाने आम्ही वाचलो.’, असेही हुपरने सांगितले.

What started as a peaceful glacier exploration at Spencer Glacier quickly turned into the biggest adrenaline rush of our…

Posted by Home with the Hoopers on Tuesday, August 13, 2019

त्याने फेसबूकवर पोस्ट करत देखील आपले अनुभव शेअर केले.

Leave a Comment