व्हॉट्सअॅपशी जोडली गेली 5 नवी फीचर


इंस्टंट मेसेजिंगसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले व्हॉट्सअॅप दरवेळेस आपल्या युजर्ससाठी काही ना काही नव-नवीन फीचर आणत असते. त्यामुळे व्हॉट्सअॅपचे जगभरात 1.5 बिलियन आणि भारतात 400 मिलियन वापरकर्ते आहते. व्हॉट्सअॅपने नुकतीच आपली 5 नवीन फीचर लाँच केली आहेत.

युजर्सची प्रायव्हेसी आणि स्पॅमिंग कन्ट्रोल करण्यासाठी व्हॉट्सअॅपने लाँच केलेली ही नवीन फीचर तयार करण्यात आले आहेत. या फीचरची टेस्टिंग व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये करण्यात येत होती आणि आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. तसेच आयओएस 13 आणि अँड्रॉईड Q अपडेट झाल्यानंतर हे फीचर उपलब्ध होईल.

फिंगरप्रिंट अनलॉक – व्हॉट्सअॅपचे हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध असून अॅपच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट अनलॉक फीचर एनेबल केल्यावर युजर्स व्हॉट्सअॅपला फिंगरप्रिंटच्या माध्यमातून लॉक-अनलॉक करु शकतात. त्यासोबतच युजरकडे व्हॉट्सअॅप नोटिफिकेशनचा कंटेंन्ट लपवण्याचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

व्हॉट्सअॅप बोट फीचर अॅक्टिव्हेट करुन सर्च इंजिन प्रमाणे त्याचा वापर करु शकता. युजर्स व्हॉट्सअॅपवर विकीपीडिया डिटेल्स, न्यूज, डिक्शनरी वैगरे सर्च करु शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅप बोट फीचरचा वापर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही करु शकता. व्हॉट्सअॅप तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार आहे.

कोणता मेसेज किती वेळा फॉरवर्ड केला आहे त्याची माहिती हे फीचर तुम्हाला देणार आहे. याशिवाय हे पण समजणार की, मिळालेला मेसेज पहिलच फॉरवर्ड केलेला आहे की नुकताच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फेक न्यूज पसरण्यावर आळा बसू शकतो.

जे लोक व्हॉट्सअॅपवर सर्वाधिक व्हॉईस मेसेजचा वापर करतात त्यांच्यासाठी हे फीचर फायदेशीर आहे. पहिले व्हॉईस मेसेज ऐकण्यासाठी प्रत्येक मेसेजवर इंडिव्हिज्युअल क्लिक करावे लागत होते. पण नवीन फीचरमध्ये तुम्ही एकदा व्हॉईस मेसेज प्ले केला की त्यानंतरचे सर्व मेसेज ऑटोमॅटिकली प्ले होणार.

फॅमिली ग्रुप आणि फ्रेन्डस ग्रुमध्ये येणाऱ्या गुड मॉर्निंग आणि इतर जोक्सला जे युजर्स कंटाळले असतील किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड तसेच विनाकारण नोटिफिकेशनने त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी हा फीचर फायदेशीर आहे. फीचरनुसार ग्रुप इनव्हाईट फीचर इनेबल केल्यावर तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुप अॅड केले जाऊ शकत नाही.

Leave a Comment