परिणीतीचे वराती मागून घोडे


सर्वच बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण अभिनेत्री परिणाती चोप्राने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा १५ ऑगस्टला देण्याऐवजी दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी दिल्या आहेत. या ट्विटमूळे नेटकऱ्यांनी परिणीतीवर निशाणा साधला आहे.


थोड्या अनोख्या पद्धतीने परिणीतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाण्यात झेंडा फडकवल्याचा व्हिडीओ तिने ट्विटरवर शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी शेअर केला आहे. परिणीतीने हा व्हिडीओ शेअर करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मे महिन्यातील हा व्हिडीओ असून परिणीतीचा कथित बॉयफ्रेंड चरित देसाई यामध्ये पाण्याच्या आत भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ परिणीतीने शेअर केल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फैलावर घेतले आहे.