जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यापासून भारत-पाकिस्तान संबंधात कमालीचा तणाव निर्माण झालेला असतानाच कराचीतील एका अब्जाधीशाच्या मुलीच्या लग्नात गायक मिका सिंहने परफॉर्म केले होते. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी संबंधित पाक अब्जाधीशाचे जवळचे संबंध असल्याचे म्हटले जात होते. ८ ऑगस्ट रोजी हा लग्नसोहळा पार पडला होता. मिका सिंहचे भारतात परतणे त्यानंतर थोडे कठीण होऊन बसले होते.
मिका सिंहला उशीरा सुचले शहाणपण
Bharat Mata ki Jai! Thank you everyone for such a warm welcome. Happy Independence Day once again and salute to our jawans. They aren’t able to celebrate any festival, all to make our lives better. Jai hind.. pic.twitter.com/cY7lQx7VUw
— King Mika Singh (@MikaSingh) August 15, 2019
भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानने बंदी घातली असताना पाकिस्तानात जाऊन मिकाने परफॉर्मन्स दिल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यातच मिकावर बंदी घालत त्याला चित्रपटसृष्टीतून बॉयकॉट करण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने (AICWA) घेतला. मिका सिंह त्यानंतर भारतात परताच एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मिका सिंह या व्हिडीओमध्ये ‘भारत माता की जय’ अशा घोषणा करताना दिसत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त एक व्हिडीओ मिका सिंहने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. मिका या व्हिडीओमध्ये ‘भारत माता की जय’ अशी घोषणा करताना दिसत आहे. पाकिस्तानाहून मिका परतत असल्याचे व्हिडीओवरुन स्पष्ट झाले आहे. माझे अशा प्रकारे स्वागत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि जवानांना माझा सलाम. कधीच कोणता उत्सव जवान आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करत नाहीत कारण आपली रक्षा करण्यात ते व्यस्त असतात, असे मिकाने ट्विटमध्ये लिहिले आहे.