‘पहलवान’चे हे गाणे तुम्ही पाहिले आहे का ?


लवकरच पहलवान या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दाक्षिणात्य अभिनेता सुदीप हा देखील झळकणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर आणि एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणे नुकतेच रिलीज प्रदर्शित करण्यात आले आहे.
सुनील शेट्टी ‘पहलवान’ चित्रपटात ‘सरकार’च्या भूमिकेत झळकणार आहे. सुनीलचा फर्स्ट लूक काहीच दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. किश्ना हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, आणि कन्नड या भाषांमध्येही हा चित्रपट रिलीज होणार आहे.

हे गाणे अरमान मलिकने गायले असून पुरग्रस्तांना मदत करणाऱ्यांना हे गाणे समर्पित करण्यात आले आहे. पुराने महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये थैमान घातले होते. या पुरग्रस्तांसाठी अनेक मदतीचे हात समोर आले होते. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी हे गाणे तयार करण्यात आले असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. २५०० स्क्रिन्सवर ‘पहलवान’ हा चित्रपट झळकणार आहे. तर, हा चित्रपट १२ सप्टेंबर २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment