यामुळे शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींची जाहिरात


आपल्या फिटनेससाठी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी ओळखली जाते. ती वेळोवेळी योग आणि एक्सरसाइजच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवत असते. सोशल मीडिया आणि यूट्यूबवर नेहमीच शिल्पा शेट्टीचे व्हिडिओ चर्चेत असतात. शिल्पा शेट्टीचे हे योग, एक्सरसाइजचे व्हिडिओज पाहून लाखो युजर्स प्रेरित होतात आणि फिटनेसकडे लक्ष देतात. शिल्पा आपल्या व्हिडिओजमुळे एक फिटनेस आयकॉन बनली असल्यामुळेच तिला नुकतीच एका औषधाच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती.

शिल्पा शेट्टीला बारीक (स्लिम) होण्यासाठीच्या औषधाच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती. ४४ वर्षीय शिल्पा शेट्टीला या जाहिरातीसाठी १० कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आली होती. पण तिने ही १० कोटी रुपयांच्या जाहिरातीची ऑफर नाकारली. शिल्पाने या संदर्भातील माहिती एका वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे. शिप्लाच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी योग्य डाएट आणि वर्कआऊट गरजेचे आहे. बारीक होण्यासाठी असलेल्या औषधांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

शिल्पा शेट्टीचे ही जाहिरातीची ऑफर नाकारल्याने कौतुक केले जात आहे. शिल्पाने घेतलेल्या या निर्णयाचे सोशल मीडियात युजर्स स्वागत करत आहेत. ही जाहिरातीची ऑफर शिल्पा शेट्टीने नाकारल्याची पहिली वेळ नाही की एखाद्या सेलिब्रेटीने जाहिरातीची ऑफर नाकारली. शिल्पा शेट्टीच्या आधी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने सुद्धा अशाच प्रकारची एक डील नाकारली होती. सुशांतसिंह राजपूत याला गोरं बनवणाऱ्या क्रीमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती.