मिशन मंगलने बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास


बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा मिशन मंगल हा काल स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झाला. यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकत्र आल्यामुळे या दिवशी सुट्टी असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणार यात तीळमात्र शंका नव्हती आणि याबाबतचे अनुमान अनेक व्यापार विश्लेषकांनी वर्तवले होते. या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमाईचा नवा विक्रम बनवला आहे. तिकीट बारीवर कमाल करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. अक्षय सोबत या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा आणि शरमन जोशी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.


मंगळ ग्रहासंदर्भातील स्पेस मिशन बाबतची सत्य कथा मिशन मंगल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मंगळ यानाच्या यशाबद्दल आधारीत चित्रपटाची कथा आहे. मंगळावर स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) मंगळयान पाठवले होते. मिशन मंगलची सुरूवात कशा प्रकारे झाली हे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. तसेच कसे एक एक नायक जोडून एक खास टीम निर्माण करण्यात येते. या टीममध्ये चार महिला शास्त्रज्ञ आहेत. त्या वेगवेगळ्या संस्कृतीतून आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आल्या आहेत. या महिला एकत्र आल्यावर कशी परफेक्ट टीम तयार होते हे यात दाखविण्यात आले आहे.

मिशन मंगलने पहिल्या दिवशी ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांच्यानुसार २९.१६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या हिशेबाने हा अक्षय कुमारच्या करियरमधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट सिद्ध झाला आहे. अक्षय कुमार याचा गोल्ड हा चित्रपट गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. २५.२५ कोटी रुपयांची कमाई गोल्डने पहिल्या दिवशी केली होती. हा चित्रपट अक्षय कुमारचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट होता. आता मिशन मंगलने त्याचा विक्रम मोडला आहे. अक्षय कुमारच्या करिअर बाबत बोलायचे तर १५ ऑगस्ट रिलीजचा तो बादशहा बनताना दिसत आहे. २०१६ मध्ये त्याचा रुस्तम हा चित्रपट आला होता. त्याने १४.११ कोटी कमाई केली होती. त्यांनंतर २०१७ मध्ये टॉयलट एक प्रेम कथा हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी १३.१० कोटींची कमाई केली होती.

Leave a Comment