बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याचा आज ४९वा वाढदिवस असून तो सध्या ‘लाल कप्तान’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सैफ अली खान या चित्रपटात नागा साधूंच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे.
सैफच्या ‘लाल कप्तान’चा टीझर रिलीज
हा टीझर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे शेअर केला आहे. सैफ अली खान ३६ सेकंदाच्या या टीझरमध्ये कपाळी विभूती लावताना दिसत आहे. सैफ अली खान कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा नाना साधूंचा अनोख्या लुकमध्ये दिसत आहे. सैफचा हा लुक पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Saif Ali Khan… First glimpse of #LaalKaptaan… Directed by Navdeep Singh… Eros International and Colour Yellow Productions presentation… 11 Oct 2019 release. #Dussehra pic.twitter.com/9Wz3xO5Vvs
— taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2019
११ ऑक्टोबर रोजी ‘लाल कप्तान’ हा चित्रपट रिलीज होणार असून नवदीप सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तसेच नागा साधू यांच्या जीवनाभोवती या चित्रपटाची संपूर्ण कथा फिरताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार असल्यामुळे प्रेक्षक देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.