सोशल मीडिया करत आहे या मुलाच्या कतृत्वाला सलाम


कर्नाटकमधील पुरग्रस्त भागात एका 12 वर्षीय मुलाने केलेल्या कामगिरीमुळे त्याची सर्वत्र कौतुक केले जात आहे. पुरामुळे पाण्यात बुडलेल्या रस्त्यावर रूग्णवाहिकेला रस्ता दाखवण्याचे कार्य करणाऱ्या या मुलाचे कौतूक होत आहे. रायपूर जिल्ह्यातील हिरेरायनकुंपी गावात राहणाऱ्या या मुलाने पुराची पर्वा न करता रूग्णवाहिकेला रस्ता दाखवला. या रूग्णवाहिकेमध्ये 6 लहान मुलांसह एका महिलेचा मृतदेह होता. 12 वर्षीय व्यंकटेशचा त्याच्या या कामगिरीसाठी प्रशासनाने स्वातंत्र्य दिनी त्याला पुरस्कार देऊन सन्मानित देखील केले.

रूग्णवाहिका भर पुरात एका पुलावरून जात असताना व्यंकटेशने रूग्णवाहिकेला रस्ता दाखवला. पुरामुळे पुल पुर्णपणे बुडाला होता. ड्रायव्हरला पाण्याचा आणि पुलाच्या स्थितीचा अंदाज घेणे कठीण होते. त्यावेळी व्यंकटेश तेथे आजुबाजूलाच खेळत होता. परिस्थितीबघून व्यंकटेश लगेच मदतीला धावला.

या घटनेला तेथे उपस्थित व्यक्तीने रेकॉर्ड केले. व्हिडीओमध्ये दिसते की, व्यंकटेश कशाप्रकारे रूग्णवाहिकेला रस्ता दाखवत आहे. रस्ता दाखवताना तो अनेकवेळा धडपडतो. व्यंकटेशला रस्ता दाखवताना बघून, गावातील लोक देखील कडेला येऊन थांबले.

कर्नाटकमध्ये आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 60 लोकांचे प्राण गेले आहेत. पुरामुळे 22 जिल्ह्यातील 7 लाख लोकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने पुरग्रस्तांसाठी 1000 पेक्षा अधिक शिबिर उभारली आहेत.

Leave a Comment