डब्ल्यूडब्ल्यूईला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बघितले जाते. अंडरटेकर आणि जॉन सिना सारखे रेसलर्सवर तर भारतीय चाहते अक्षरशः जिवापाड प्रेम करतात. जॉन सिना देखील भारतीय चाहत्यांना भेटण्यासाठी भारतात आला आहे. त्याने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या फेसबूकवर पोस्टकरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, Happy Independence Day, India’
जॉन सिनाने दिलेल्या या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत त्याच्या या व्हिडीओ 11 हजार पेक्षा अधिक लोकांनी शेअर केला आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ बघितला आहे. जॉन सिना 16 वेळा डब्ल्यूडब्ल्यू चॅम्पियन राहिलेला आहे. जॉन रेसलिंग जगतातील एक प्रसिध्द स्टार आहे.
जॉन सिनाने दिल्या भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
लहानपणी जॉन सिनाला रेसलर नाही तर रॉक स्टार बनायचे होते. म्युझिकच्या क्षेत्रात नाव कमवायचे होते. 2009 मध्ये एलिजाबेथ हबरडियूबरोबर त्याने लग्न केले होते. मात्र 2012 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याने डब्ल्यूडब्ल्यूई स्टार निकी बेलाबरोबर लग्न केले होते.