या ‘पाकिस्तानी बहिणी’ने पंतप्रधान मोदींना बांधली राखी


15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाबरोबर रक्षाबंधनचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यानंतर त्यांनी नेहमी प्रमाणेच लहान मुलांकडून आणि महिलांकडून राखी बांधून घेतली. यादरम्यान एका पाकिस्तानी महिलेने देखील त्यांना राखी बांधली आणि पतीद्वारे बनवण्यात आलेली पेटिंग देखील गिफ्ट म्हणून दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पंतप्रधान मोदींच्या या पाकिस्तानी बहिणीचे नाव मौहशीन शेख आहे. त्या मूळ पाकिस्तानी असून, लग्नानंतर भारतात आल्या.  त्यानंतर त्या गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहत आहेत. अनेक वर्षांपासून ही महिला पंतप्रधान मोदींना राखी बांधत आहे. मौहशीन यांचे पती पेंटर आहेत. त्यांच्या पतीने बनवलेली पेटिंग त्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिली.

रक्षाबंधनची तिथी –
रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पोर्णिमेला साजरा केले जाते. यंदा रक्षाबंधन गुरूवारी असल्याने त्याचे अनेक कारणांमुळे महत्त्व आहे. यादिवशी भद्र काळ नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रहण नाही. याच कारणामुळे यंदाचा रक्षबंधन सौभाग्यशाली समजला जात आहे.

पोर्णिमा प्रारंभ – 14 ऑगस्ट 2019 ला रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी
प्रोर्णिमा समाप्त – 15 ऑगस्ट 2019 ला रात्री 22वाजून 29 मिनिटांनी

Leave a Comment