तुम्ही ऐकले आहे का भारतीय जवानाचे हे हृदयस्पर्शी गाणे?


15 ऑगस्टला संपुर्ण भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपुर्ण भारत तिरंगामय झाला आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लोक देखील उत्सुक आहेत.

याच निमित्ताने एका आयटीबीपी जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जवान बॉर्डर चित्रपटातील ‘संदेसे आते हैं हमें तड़पाते हैं जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, लिखो कब आओगे’ गाणे गात आहे. हा व्हिडीओ भारत-तिबेट सीमा पोलिसांनी शेअर केला आहे.

आज आपण आपल्या घरात सुखाने-शांततेत राहत आहोत याचे संपुर्ण श्रेय हे सीमेवर देशाच्या रक्षणासाठी दिवसरात्र पहारा देणाऱ्या जवानांना जाते. आयटीबीपीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या।’

याच बरोबर कँप्शनमध्ये लिहिले की, आयटीबीपीचे कॉन्सटेबल लवली सिंह यांनी 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे गीत आपल्या सहकाऱ्यांना समर्पित केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. केंद्रिय क्रिडा राज्यमंत्री किरण रजजू यांनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिला.

 

किरेन रिजिजू यांनी लिहिले की, आयटीबीपी जवान लवली सिंहतर्फे एक ह्रदयाला स्पर्श करणारे गाणे. मी आपल्या जवानांसोबत खूप जवळून काम केले आहे आणि सीमाभागात त्यांच्याबरोबर राहिलो आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 1 हजार पेक्षा अधिक लोकांनी बघितले असून, 300 पेक्षा अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, खूप छान, मला भारतीय असण्यावर गर्व आहे. जय हिंद !

‘बॉर्डर’ चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले आहे. तर गाणे कुमार राठोड आणि सोनू निगम यांनी गायले आहे.

Leave a Comment