तब्बल 20 नंतर डॉक्टरांनी काढली पोटात अडकलेली वस्तू


चीनच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी एका रूग्णाच्या आतड्यांमधून चक्क टुथब्रश काढला आहे. त्या व्यक्तीने 20 वर्षांआधी आत्महत्या करण्यासाठी तो टुथब्रश गिळला होता. चीनच्या गुआंग  डोंग राज्यातील शेनजेन शहरातील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. डॉक्टरांच्या म्हणणे आहे की, आमच्याकडे रूग्णांच्या पोटात शिक्के, लायटर, कैच्ची निघाल्याची अनेक प्रकरणं येत असतात, मात्र टुथब्रश निघण्याचे हे प्रकरण अनोखे आहे. कारण या रूग्णाने टुथब्रश जाणूनबुजून आत्महत्या करण्यासाठी गिळले होते.

51 वर्षांच्या या रूग्णाचे नाव ली असल्याचे सांगितले जात आहे. त्याला काही दिवसांपुर्वी पोटात दुखःत असल्याने हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी सिटी स्कँन करत आतड्यांमधून एक विचित्र छोटी वस्तू बाहेर काढली.

डॉक्टरांनी विचारल्यावर लीने सांगितले की, कदाचित 20 वर्षांपुर्वी आत्महत्या करण्यासाठी गिळलेला टुथब्रश असेल. आत्महत्या करण्याचे प्रत्येक प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर त्याने टुथब्रश गिळला होता. एवढे वर्ष टुथब्रश पोटात असताना देखील त्याला काहीही त्रास झाला नाही.

वर्ष 2014 मध्ये पोट दुखण्याचा त्रास सुरू झाल्याने त्याने औषध घेण्यास सुरूवात केली. मात्र पोट दुखत असल्याने त्याने सिटी स्कँन केले. लीने सांगितले की, टुथब्रश गिळल्यानंतर देखील जीव न गेल्यावर मी एचआयव्हीच्या आजारांचे औषध घेऊ लागलो. नंतर जेलमधील शिक्षा पुर्ण झाल्यानंतर लग्न केले. मला दोन मुले आहेत. त्यानंतर मी फँमिलीमध्ये एवढा व्यस्त झालो की, टुथब्रशविषयी विसरूनच गेलो.

लीच्या डॉक्टरांनी सांगितले की,  टुथब्रश ली च्या पोटात अनेक वर्ष होता आणि हळूहळू छोट्या आतड्यांमध्ये अडकत गेला. जर यावर उपचार वेळेवर नसते झाले तर टुथब्रश यकृतापर्यंत पोहचला असता. आम्ही वेळेवर ऑपरेशन केले.

Leave a Comment