Video : भुकेने तडफडणाऱ्या सापाने गिळले स्वतःचेच शरीर


सध्या एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका भुकेने तडफडणाऱ्या सापाने स्वतःचेच अर्धे शरीर खाल्ले आहे. हा विचलित करणारा व्हिडीओ सोशल मीडियवर शेअर केला जात आहे. साप भुकेने तडफडत होता, अखेर त्याला भूक सहन न झाल्याने त्याने स्वतःचेच शरीर खाल्ले.

फॉरगॉटन फ्रेंड रेपटाइल सेंच्युरीने फेसबूकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीमध्ये दिसते , सापाने स्वतःलाच खाल्ले आहे. व्हिडीओमध्ये रॉथ हँकर नावाचा व्यक्ती सांगत आहे की, किंग स्नेकर साप हे भूक लागल्यावर दुसऱ्या सापाला खातात अथवा स्वताचेच शरीर खाऊन टाकतात.

Jesse rescues a hungry kingsnake from eating himself 🐍😮😳👍🏻

Posted by Forgotten Friend Reptile Sanctuary on Friday, August 9, 2019

त्यांनी सांगितले की, साप जेव्हा शेपूट बघतो तेव्हा त्याला दुसरा साप समजून खाऊन टाकतो. हा साप कधीच पुर्णपणे स्वतःला खाऊ शकत नाही.

त्यांच्याच टीम मेंबरनेच त्या सापाचे प्राण वाचवले. त्याने सांगितले की, साप जेव्हा खात असतो तेव्हा त्याचे नाक दाबल्यावर त्याला आवडत नाही. त्यामुळे त्याला भिती वाटते आणि तो जे खात असतो ते लगेच सोडून देतो.

Leave a Comment