सीबीआयच्या कामात राजकीय ढवळाढवळ नको – सरन्यायाधीश गोगोई


नवी दिल्ली : सीबीआय आपली जबाबदारी राजकीय ढवळाढवळीमुळे चोख पार पाडू शकत नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी अशी टीका केली आहे. रंजन गोगाई हे दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमात बोलत होते. राजकीय हस्तक्षेप ज्या प्रकरणात नसतो सीबीआय त्या प्रकरणात चांगले काम करते. पण राजकीय हस्तक्षेप ज्या प्रकरणात होतो. त्यावेळी सीबीआय तेवढी चांगली कामगिरी दाखवू शकत नाही आणि ते प्रकरण न्यायालयात पाहिजे त्या क्षमतेने तडीस जाऊ शकत नाही, अशी खंत गोगोई यांनी यावेळी व्यक्त केली.

सीबीआयच्या कामात कुठे न कुठे राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. कॅगसारखी स्वायत्तता सीबीआयला मिळावयास हवी असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. सीबीआयमध्ये १५ टक्के वरिष्ठ पदे, २८ टक्के तांत्रिक पदे आणि ५० टक्के कायदेशीर विभागात जागा रिकाम्या असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा ताण असतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कुठलाही राजकीय हस्तक्षेप सीबीआयमध्ये होऊ नये यासाठी अनेकदा न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्याचअंतर्गत यूनियन ऑफ इंडिया विरुद्ध विनित नारायण प्रकरणात निकाल दिल्याचे रंजन गोगोईंनी सांगितले.

Leave a Comment