बलात्कारपिडिता गेली ४८ वर्षे अशी करतेय पोलिसांची मदत


बलात्कार किंवा रेप हा कोणाही महिलेचा आतमविश्वास खच्ची करणारा आणि अनेकदा तिला आयुष्यातून उठविणारा ठरतो. अमेरिकेत याच प्रकाराला वयाच्या २१ व्या वर्षी बळी पडलेल्या आणि त्यामुळे मोडून पडलेल्या लुईस या महिलेने मात्र या आत्मक्लेशातून मार्ग कडून जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आज लुईस ६९ वर्षाची आहे आणि गेली ४८ वर्षे रेपिस्ट गुन्हेगाराची स्केचेस रेखाटून ती पोलिसांना त्यांना पकडण्यास मदत करते आहे. आजपर्यत तिच्या या स्केचेसच्या मदतीने पोलिसांनी १२०० हून अधिक बलात्कारयाना पकडण्यात यश मिळविले आहे. लुईसच्या या कामाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकोर्ड मध्ये घेतली गेली आहे.

लुईस सांगते. जेव्हा केव्हा मी बलात्कार झाल्याची बातमी ऐकते तेव्हा तेव्हा माझ्या मदतीची त्यांना गरज आहे असे वाटते. लुईस २१ वर्षाची असताना घरात शिरलेल्या एका रेपिस्टने तिच्यावर ती बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार केले आणि ती मेली असे समजून तो पळून गेला होता. लुईस सांगते दोन आठवडे मी घरातच काढले. पोलिसांत तक्रार केली तर त्यांना यात माझीच चूक आहे असे वाटेल म्हणून तिने पोलिसांना कळविले नाही आणि गाव सोडून टेक्सासला स्थलांतर केले. तिथे कला शाखेत शिक्षण सुरु असताना एका डान्स टीचरने त्याचा विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली तेव्हा मात्र अगोदरच संतप्त असलेल्या लुईसने तिच्या कलेचा वापर पोलिसांच्या मदतीसाठी करायचा निर्णय घेतला.

लुईस त्या बलात्कारित मुलीला घेऊन पोलिसांकडे गेली आणि त्या मुलीला विचारून तिने रेपिस्टचे अचूक स्केच बनवून पोलिसांना दिले आणि पोलिसांनी त्या स्केचच्या मदतीने गुन्हेगाराला पकडले. लुईसने तिच्यावर बलात्कार केलेल्या माणसाचे स्केच बनवूनही पोलिसांना दिले व पोलिसांनी त्यालाही अटक केली. तेव्हापासून लुईस पोलिसांची मदत करते आहे आणि १२०० हून अधिक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना या स्केचेसची खूपच मदत झाली आहे. लुईस दिलेल्या वर्णनाववरून इतके अचूक स्केच बनविते कि कित्येकदा पोलीसानी स्केचेस जारी केल्यावर गुन्हेगार स्वतः होऊन पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत.

Leave a Comment