साक्षी चोप्राने भर पावसात लावली आग


सोशल मीडिया सेलिब्रेटी, गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली साक्षी चोप्राने नुकतेच इंस्टाग्रामवर आपल्या खास बिकीनी अवतारातील फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी जे पाहून फोटोखाली लाईक्स, कॉमेंट आणि शेअरचा धमाका उडवून दिला आहे. साक्षीच्या लूकवर ते त्यांच्या प्रतिक्रिया पाहता चांगलेच फिदा झाल्याचे दिसते.


चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया साक्षी चोप्रा हिचे सेक्सी, बोल्ड आणि हॉट फोटो पाहून व्यक्त केल्या आहेत. साक्षीला उपदेश करणाऱ्यात तर काही टीका करणाऱ्या प्रतिक्रियांचा देखील यात समावेश आहे. पण, साक्षीचे बिकीनी अवतारातील सौंदर्य पाहून तिचे कौतुक करणारांची पण काही कमी नाही.

View this post on Instagram

Oh, hi there bikini | @dollskill

A post shared by saksh (@sakshichopraa) on


90 च्या दशकात लोकप्रिय असलेल्या ‘रामायण’ या टीव्ही मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांच्या नातवाची साक्षी चोप्रा ही मुलगी आहे. साक्षी आपल्या बोल्ड आणि मदमस्त अंदाजाने अनेकदा चर्चेचा आणि प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तुम्हालाही साक्षी कशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते याचा अंदाज येईल.


आपले अत्यंत बोल्ड आणि तितकेच हॉट फोटो साक्षी चोप्रा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने या आधीही अनेकदा आपले सेक्सी फोटो सोशल मीडियावर खास करुन इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


साक्षी चोप्रा हिचे इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया सेलिब्रेटी असण्यासोबतच साक्षी चोप्रा ही गायिकाही आहे. तिचे युट्यूब चॅनलही आहे. ज्यावर ती आपली गाणी अपलोड करते.


तिच्या चाहत्यांना तिच्या बोल्ड फोटोंची प्रतिक्षा असते. तिचे तोंडभरुन ते कौतुक करतात. पण, साक्षीचे टीकाकारही खूप आहेत. तिच्या फोटोखाली जे तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवतात. पण, साक्षी कोणाची टीका फार मनावर घेत नाही.


साक्षीची एक मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. ज्यात तिने म्हटले होते की, माझ्यासाठी तुम्ही अनेक खाणेरडे शब्द वापरु शकता. अशा प्रतिक्रियांकडे मी लक्षच देत नाही. तुमचीच बॉडी तुम्ही कव्हर करुन खूश असाल आणि मला असे बोलत असाल तर आपण ते करु शकता. मला त्याचा काहीही फरक पडत नाही.

Leave a Comment