या पठ्ठ्याने विमानाने केला एकट्याने प्रवास


विमानाची वेळ बदलण्याची घटना अनेक वेळा घडत असे. विमान उशीरा उड्डाण घेणार असले की, आपला देखील वेळ वाया जातो. मात्र एका व्यक्तीला विमानाला काही तांत्रिक अडचणीमुळे उड्डाण घेण्यास उशीर झाल्यामुळे असा अनुभव आला जो त्याच्या कायमच्या लक्षात राहिल.

मागील आठवड्यात न्युयॉर्कमधील दिग्दर्शक विन्सेंट पिओने साल्ट लेक सिटीवरून कोलारॉडोला घरी चालला होता. काही अडचणींमुळे विमानाला उशीर झाला आणि काही अडचणीमुळे योगायोग असा झाला की, तो विमानात प्रवास करणारा एकमेव प्रवाशी बाकी होता. पिओने जेएफके विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या डेल्टा फ्लाइटमध्ये एकमेव प्रवासी होता.

त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेअर केला. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मागील आठवड्याच डेल्टाने मला प्रायव्हेट जेटचा प्रवास घडवला. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीमध्ये विन्सेंटने सांगितले की, काही कारणांमुळे फ्लाइटची वेळ बदलण्यात आली होती. त्यामुळे मी बदल करून सात वाजता विमानतळावर आलो. मला माहिती नव्हते की, त्या छोट्याशा विमानतळावर प्रवास करणारा मी एकटाच प्रवासी आहे. मी डेस्कजवळ गेल्यावर त्यांनी देखील अनाउंसमेंट करण्याची गरज आहे की नाही माहित नाही कारण तुम्ही एकटेच प्रवासी आहात. मात्र मी त्यांना अनाउंसमेट करायला सांगितली. सर्वांनाच ते आवडले.

विमानात मला कुठेही बसण्यास सांगितले. मी कुठेही बसू शकत होतो. मी सर्व ठिकाणी बसून आनंद घेण्याचा प्रयत्न केला. या आधी मी चित्रपटासाठी प्रायव्हेट जेटचा वापर केला होता. मात्र असा अनुभव कधीच घेतला नसल्याचे विन्सेंट पिओनेने एका मुलाखतीमध्ये सांगितले.