साराला वरुण धवनची वाढदिवशी स्पेशल भेट


आज अभिनेत्री सारा अली खान हिचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आत्तापर्यंत अवघ्या दोनच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सारा अली खानचा फार मोठा चाहता वर्ग आहे. ती लवकरच अभिनेता वरुण धवनसोबत ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरुण धवनने साराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज केले आहे. सारा आणि वरुणचा फर्स्ट लूक यामध्ये पाहायला मिळतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे करत आहेत. साराचा ग्लॅमरस लूक ‘कुली नंबर १’च्या टीजर पोस्टरमध्ये दिसतो. तर, कुलीच्या रुपात वरुण धवनही धमाल अंदाजात पाहायला मिळतो. हा चित्रपट गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या सुपरहिट ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचाच रिमेक आहे. पुढच्या वर्षी १ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Comment