संभाजीराजे पूरग्रस्तांसाठी खर्च करणार 5 कोटी


कोल्हापूर : राज्यभरातून पुराने वेढलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मदत होत आहे. राज्य सरकारसह अनेक संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट मदत करत आहेत. पूरग्रस्त भागात 5 कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. याबाबतची माहिती संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली.


महापुराने प्रभावित क्षेत्रात माझ्या निधीतून 5 कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. हे मला माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाजसेवेसाठी माझे संपूर्ण जीवनच समर्पित असल्याचे संभाजीराजे म्हणाले.


आर्थिक मदतीची घोषणा करताना, संभाजीराजेंनी मदतीवेळी माझा फोटो लावू नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त लोकांना मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका! जे काही द्यायचे आहे ते निस्वार्थ भावनेने द्या! असे संभाजीराजे म्हणाले.

Leave a Comment