सोशल मीडियात व्हायरल होत असलेला मुंबई पोलीस आयुक्तांचा व्हिडीओ खोटा


जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया आणि पुढील आठवड्यात येऊ घातलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच दहशतवाद्यांचे मुंबईवर सुद्धा सावट असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय ही देशात हिंसाचार पसरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करताना संबंधित व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे, मुंबई पोलीस आयुक्त कथित व्यक्ती ही असल्याचे म्हटले जात आहे. अवघ्या काहीच वेळात पसरलेल्या या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण याबाबत तपास करता हा व्हिडीओ खोटा असून अशा प्रकारे कोणतेही अलर्ट दिले नसल्याचे समोर आले आहे.

एक व्यक्ती या व्हिडिओमध्ये, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे नाव घेत मुंबईसह देशातील 19 शहरांमध्ये हाय अलर्ट असल्याचे सांगताना पाहायला मिळत आहे, तसेच मुंबईत विमानतळ, रेल्वे स्थानक, सिनेमा टॉकीज, किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा कारणास्तव खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. हा मॅसेज अधिक व्यक्तीपर्यंत पोहचवून सर्वांना दक्ष करा असेही सांगितले आहे.


याबाबत तपास केला असता, या व्हिडिओतील व्यक्ती ही मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे नसून कोणीतरी भलतीच असल्याचे समजत आहे. तसेच याबाबतची माहिती पोलीस आयुक्त बर्वे, मुंबई पोलिस किंवा देशातील अन्य कोणत्याच विश्वासार्ह्य संघटनेने दिल्याचे समोर आलेले नसल्यामुळे या व्हिडीओची पुष्टी न झाल्याने हा एक खोटा व्हिडीओ असल्याचे सिद्ध झाले आहे.

दरम्यान नौदलाचे उपप्रमुख मुरलीधर पवार यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना ‘समुद्री जिहाद’चा कट रचत असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय नौदलाला ज्यावर खबरदारी म्हणून हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच सीमेवर व देशात अनेक ठिकाणी या परिस्थितीत सैन्याच्या तुकड्या देखील जागृक आहेत. पण नागरिकांनी घाबरून न जाता अशा प्रकारचे खोटे मेसेज पसरवू नये.

Leave a Comment