डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलचं खास डुडल


सर्च इंजिन गुगले भारतीय वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांना डुडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. विक्रम साराभाई यांची आज 100 वी जयंती आहे. भारत आज अंतराळ क्षेत्रात जी मोठमोठी कामगिरी करत आहे, यश प्राप्त करत आहे या सर्वांचे श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांना जाते. विक्रम साराभाई यांचे डुडल मुंबईमधील कलाकार पवन राजुरकर यांनी बनवले आहे.

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 ला अहमदाबाद येथे झाला. त्यांचे वडिल अंबालाल साराभाई हे एक श्रींमत उद्योगपती होते. गुजरातमधील देखील ते अनेक मिल्सचे मालक होते.

त्यांनी केंम्ब्रिज युनिवर्सिटीच्या सेंट जॉन कॉलेजमधून डॉक्टरेट डिग्री मिळवली. विक्रम साराभाई हे असे वैज्ञानिक होते जे नेहमी युवा वैज्ञानिकांना पुढे आणण्याचे काम करत असे. साराभाई यांनी 1947 मध्ये अदमदाबाद येथे भौतिक अनुसंधान प्रयोगशाळाची स्थापना केली.

इस्रोची स्थापना –

इस्रोची स्थापना हे विक्रम साराभाई यांच्या प्रमुख कामगिरींपैकी एक आहे. रशियाच्या स्पुतनिक लाँचनंतर त्यांनी भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना अंतरिक्ष कार्यक्रमांचे महत्त्व समजावत सरकारला तयार केले.

इस्रो आणि पीआरएलच्या शिवाय, त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अणू उर्जा आयोगाच्या अध्यक्षपदावर देखील विक्रम साराभाई होते. त्यांनी अहमदाबादमध्ये अन्य उद्योगपतींना सोबत घेऊन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मँनेजमेंट, अहमदाबादची देखील स्थापना केली.

विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या संस्था –

भौतिक अनुसंधान प्रयोगशाला (पीआरएल), अहमदाबाद

– इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मँनेजमेंट (आयआयएम), अहमदाबाद

– कम्यूनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद

– दर्पण अकँडेमी फ़ॉर परफार्मिंग आर्ट्स, अहमदाबाद

– विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र, तिरुवनंतपुरम

– स्पेस एप्लीकेशन सेंटर, अहमदाबाद

– फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टर (एफबीटीआर), कल्पकम

– वेरिएबल एनर्जी साइक्लोट्रॉन प्रोजेक्ट, कोलकाता

–  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(ईसीआयएल), हैद्राबाद

–  यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (यूसीआयएल), जादूगुडा, बिहार

अंतराळ शेत्रात भारताचे नाव जगभरात पोहचवणारे महान वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांचा 30 सप्टेंबर 1971 ला कोवलम, केरळ येथे मृत्यू झाला.

Leave a Comment