तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटील यांनी झापले


कोल्हापूर – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुराची पाहणी करताना सेल्फी व्हिडीओत हसून दाद दिल्याने त्यांच्यावर आणि पक्षांच्या इतर नेत्यांवर टीका होत असताना आता तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झापल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका पूरग्रस्ताने शेतीच्या सातबाऱ्यासंबंधी विचारला असता त्याला त्यांनी ए गप्प म्हणत खाली बसवले. पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटील यांनी अशी वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे.

शिरोळीमधून रोड सुरु झाला तर जे आपल्याला हवे ते आणता येईल. मी आपणा सर्वांना म्हणून प्रार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता सरकार पूर्णपणे आपल्या पाठिशी आहे याची खात्री बाळगा. तक्रारी करुन काही होणार नाही. सूचना करा प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार ? बिचारे चोवीस चोवीस तास झोपलेले नाहीत, असे चंद्रकांत पाटील बोलत होते.

लोकांमध्ये बसलेला एक पूरग्रस्त याचवेळी उभा राहून आपली व्यथा मांडतो. यावेळी चंद्रकांत पाटील त्याला सगळे करतो सांगतात आणि शेवटी वैतागून ए गप्प म्हणत खाली बसायला सांगतात. चंद्रकांत पाटील यांनी अशा भाषेचा वापर केल्याने पूरग्रस्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment