बकरी ईद : या बकऱ्याच्या मानेवर लिहिले आहे ‘अल्लाह’

आज भारतात सर्वत्र बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. बाजारात देशी प्रजातींच्या बकरींची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बकरी खरेदी करण्यासाठी देखील बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील एका बकरीची सध्या विशेष चर्चा सुरू आहे. या बकऱ्याची किंमत तब्बल 5 लाख रूपये आहे. केवळ किंमतीमुळेच नाही तर अन्य एका कारणासाठी हे बकरे विशेष चर्चेत आहे.

गोरखनाथ भागातील जाहिदाबाद मछली भागात राहणाऱ्या मोहम्मद निजामुद्दीन यांचा सलमान नावाचे बकरे विशेष आकर्षणाचे केंद्र झाले आहे. खास गोष्ट ही की, या बकऱ्याच्या गळ्यावर नैसर्गिक रित्या अरबी भाषेत ‘अल्लाह’ लिहिलेले आहे. याच कारणामुळे या बकऱ्याची किंमत 5 लाख रूपये लावण्यात आली आहे. गोरखपूरमधील हे सर्वात महाग बकरे आहे.
हे बकरे खरेदी करण्यासाठी अनेक लोक आले आहेत. आतापर्यंत याला खरेदी करण्यासाठी 2 लाख 75 हजारांचा भाव लावण्यात आला आहे. मात्र याची किंमत 5 लाख ठेवणण्यात आली आहे. पाढंऱ्या काळ्या रंगाच्या या बकऱ्याचे वजन 60 किलो आहे.

बकऱ्याचे मालक निजामुद्दीन यांचे म्हणणे आहे की, या बकऱ्याला दोन वर्षांपुर्वी आणण्यात आले आहे. आधी समजले नाही की, याच्या शरीरावर अल्लाह लिहिलेले आहे. अचानक एके दिवशी निजामुद्दीनच्या आईने बघितले की, बकऱ्याच्या गळ्यावर अरबीमध्ये ‘अल्लाह’ लिहिलेले आहे.

यानंतर सर्व लोकांना बोलवून दाखवण्यात आले तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. तेव्हापासूनच सलमानची किंमत वाढली. आजुबाजूची लोक त्याला बघायला येऊ लागले. सलमान नावाचा हा बकरा संपुर्ण शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

Leave a Comment