‘आंतकवादी’ म्हणणाऱ्यांना 10 वर्षीय शीख मुलीने दिले उत्तर

लंडनमध्ये खेळाच्या मैदानावर आंतकवादी म्हणल्याने 10 वर्षीय शीख विद्यार्थींनी मुनसिमर कौरने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे लोकांना उत्तर दिले आहे. यामध्ये ती म्हणाली की, वंशद्वेषापासून वाचण्यासाठी शीख समुदायाच्या माहितीचा सर्वत्र प्रचार केला गेला पाहिजे.

मुनसिमरच्या वडिलांनी ट्विटरवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 50 हजार पेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. पगडी बांधलेल्या या मुलीने दक्षिण-पुर्व लंडनमधील प्लमस्टिड प्लेग्राउंडवर तिच्याबरोबर झालेल्या घटनेबद्दल सांगताना म्हणाली की, सोमवारी आणि मंगळवारी चार मुलांनी आणि एक मुलांच्या आईने माझ्याशी योग्य व्यवहार केला नाही.

मुनसिमरने सांगितले की, सोमवारी 14 ते 17 वर्षांच्या दोन मुलांनी आणि दोन मुलींना मी ते खेळत असलेल्या खेळ खेळण्याबद्दल विचारले.  मात्र त्यांनी नकार देत ते म्हणाले की, तू नाही खेळू शकत कारण तू आतंकवादी आहेस.

मुनसिमरने सांगितले की, यामुळे तिला खूप वाईट वाटले. मात्र ती काहीच न बोलता तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती त्याच प्लेग्राउंडवर गेली आणि एका नऊ वर्षांच्या मुलीबरोबर तिची मैत्री झाली. एक तासानंतर तिच्या आईने तिला बोलवले व सांगितले की, ती माझ्याबरोबर नाही खेळू शकत कारण मी खूप खतरनाक दिसते.

मुनसिमरने सांगितले की, त्या मुलीने तिची यात काहीही चुकी नव्हती असे सांगत माफी मागितली.

मुनसिमर म्हणाली की, हा अनुभव दर्शवतो की, लोकांना किती ज्ञान आणि माहिती आहे.  शीख हे काहीही झाले तरी सर्वांवर प्रेम करतात, सर्वांची काळजी घेतात.

तिच्या या संदेशाचे अनेकांनी समर्थन केले आहे आणि सर्व जण तिचे कौतूक देखील करत आहेत.

Leave a Comment