मोदीजींनी माझे ऐकून कलम ३७० रद्द केल्याबद्दल आभार!


कलम ३७० रद्द करुन जम्मू तसेच काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा केंद्रातील मोदी सरकारने काढून घेतला. पण यावरुन नेहमीच वादग्रस्त वक्तव्य आणि वायफळ बडबड करणारी बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणजेच अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राखी सावंतचे हा ऐतिहासिक निर्णय ऐकून घेतला असल्याचे ती या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

आदरणीय मोदीजी, तुमचा मला फार अभिमान आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात, तुमच्यासारखा कोणी नाही. कलम ३७० वर आधारित आगामी चित्रपटात मला भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक, निर्मात्यांचे आभार. या चित्रपटाची शूटिंग काश्मीर आणि कुलूमध्ये होणार आहे. पण आम्ही सर्वांत आधी तो मुद्दा उचलला होता. मोदीजींचे माझे ऐकल्याबद्दल आभार, असे या व्हिडीओत ती म्हणत आहे. कलम ३७० सरकारने रद्द केल्याचे श्रेय राखी स्वत: घेताना दिसत आहे.


कौशल इनामदार यांनी राखीचा हाच व्हिडीओ शेअर करत तिची खिल्ली उडवली आहे. मोदीजी, तुमच्या भाषणात राखी सावंतचे नाव न घेऊन तुम्ही फार चुकीचे केले. कलम ३७० तिच्यामुळेच रद्द झाले आहे. मी कविता कृष्णन यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आंदोलन राखीकडे सोपवावे कारण राखीचा कलम ३७० रद्द होण्यामागे मोलाचा वाटा असल्याचे संगीतकार कौशल इनामदार यांनी लिहिले आहे.

Leave a Comment