या बकऱ्याची किंमत ऐकून तुम्ही देखील व्हाल आश्चर्यचकित


12 ऑगस्टला देशभरात बकरी ईद साजरी केली जाईल. मुस्लिम समाजाच्या या खास सणाबद्दल लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या सणा निमित्त बकरी बाजार देखील सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बकऱ्यांवर विक्रमी बोली लावली जात आहे.

अलरी प्रजातीचे बकरे सर्वाधिक महागडे असतात. जामा मस्जिद येथील बकरी बाजारामध्ये या प्रकारचे तीन बकरे असून, त्यांची किंमत सुमारे 11 लाख लावण्यात आली आहे. 175 ते 200 किलो वजन असणाऱ्या या बकऱ्यांना इक्रम नावाच्या व्यक्तीने अगदी बाळांप्रमाणे संभाळले आहे.

तसेच, बकरी बाजारामधील चांद नावाचा बकरा देखील सध्या विशेष चर्चत आहे. त्याची मालकाने त्याची किंमत तब्बल 4 लाख 50 हजार लावली आहे. बाजारात बरबरे, मेवाती, अलवरी, दोगले आणि देसी प्रजातींच्या बकऱ्यांची जोरदार मागणी आहे.

रिपोर्टनुसार, बकऱ्यांना जाडे करण्यासाठी बिअरमध्ये केमिकल टाकून पाजतात. जेणेकरून त्यांच्यावर चांगली बोली लागेल. बिअरबरोबरच काही लोक बकऱ्यांना सोडा, बेसन सारख्या गोष्टी टाकून देखील पाजतात. काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे बकऱ्यांना चांगली किंमत मिळते.

Leave a Comment