या शिवमंदिरात घडतो चमत्कार


केरळच्या एका शिवमंदिरात घडणारा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांच्या रांगा नेहमीच लागतात आणि श्रावण महिन्यात या रांगा आणखी मोठ्या होतात. किजापेरूपल्लम गावात कावेरी नदीकाठी असलेले हे नागनाथस्वामी मंदिर केती स्थळ या नावानेही प्रसिद्ध आहे. हे मंदिर केतू पूजेसाठी विशेष प्रसिद्ध असून ज्यांना राहू केतू दोष आहे ते या मंदिरात या दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून आवर्जून येतात. या मंदिरातील मुख्य देव महादेव आहे.


राहू आणि केतू हे छाया ग्रह मानले जातात. केतुला सापाची देवता मानले जाते. असे सांगतात ज्या कुणाच्या पत्रिकेत राहू केतू दोष आहे त्यांनी मनोभावे येथे अभिषेक केला तर शिवलिंगावर वाहिलेल्या दुधाचा रंग बदलून निळा होतो. ज्यांच्या बाबतीत हे घडते त्यांना राहू केतू दोषातून मुक्तता मिळाली आहे असा अर्थ काढला जातो.

श्रावण महिन्यात येथे खूप गर्दी होते. या मंदिराची कथा अशी सांगतात, राहुला एका ऋषींनी तो नष्ट होईल असा शाप दिला तेव्हा राहुने शिवाची येथे उपासना करताना घोर तपस्या केली होती. तेव्हा शिवाने राहुसमोर प्रकट होऊन त्याला मिळालेल्या शापातून मुक्ती दिली. म्हणून या मंदिरात राहू त्याचा गणांसह विराजमान आहे. राहूचे स्वरूप म्हणजे डोके माणसाचे आणि बाकीचे शरीर म्हणजे केतू असे मानले जाते.

Leave a Comment