अन् मैदानातच गेलसोबत थिरकला विराट कोहली…


भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून टी-20 मालिका 0-3 अशी जिंकल्यानंतर कालपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. पण पहिल्या सामन्याला पावसाचा फटका बसला. नाणेफेकीस गयाना येथे सुरु असलेल्या पावसामुळे उशीर झाला. पंचांनी पावसाचा जोर ओसरल्यानंतर खेळपट्टीची पाहणी करत मैदान खेळण्यायोग्य असल्याचे जाहीर केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


पण सामन्याच्या सहाव्या षटकातच पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. पावसाचा जोर काही क्षणांनी ओसरल्यानंतर मैदानात खेळाडू काहीकाळासाठी उतरले होते. पण पावसामुळे मैदानातील एक भाग ओला राहिल्याचे पंचांच्या निदर्शनास विराटने आणून दिले. हा भाग सुकवण्याचे काम मैदानातील कर्मचारी करत असताना मैदानावर सुरु असलेल्या संगीताच्या तालावर विराटने ठेका धरला. विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलनेही यावेळी विराटला साथ दिली. ओला भाग सुकवण्याचे काम मैदानातील कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर, पंचांनी वाया गेलेला वेळ लक्षात घेऊन डकवर्थ लुईस नियमानुसार सामना ३४ षटकांचा खेळवण्यात येईल अशी घोषणा केली.

Leave a Comment