‘या’ दिवशी रिलीज होणार ‘साहो’चा ट्रेलर


अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘साहो’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी उत्सुक होते. पण चाहत्यांना आता ट्रेलरची फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण, या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘साहो’चे एक पोस्टर शेअर करुन याबाबतची माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे. हा ट्रेलर येत्या १० ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात येणार आहे.


हा चित्रपट सुरुवातीला १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. पण याच दिवशी अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट देखील रिलीज होत असल्यामुळे ‘साहो’च्या रिलीज डेटमध्ये बदल करुन ३० ऑगस्ट करण्यात आली आहे. नील नितिन मुकेश, चंकी पांडे आणि जॅकी श्रॉफ यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना हिंदीसह तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत पाहता येणार आहे.

Leave a Comment