व्हायरल होत आहे काजोलचा धमाकेदार डान्स


आपल्यापैकी अनेकांनी शिल्पा शेट्टी, काजोल आणि शाहरुख खान यांच्या बाजीगर चित्रपटातील लोकप्रिय ‘ये काली काली आंखे’ हे गाणे पाहिले किंवा ऐकले असेल. शाहरुख आणि काजोलच्या या गाण्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भूरळ घातली होती. आता हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण या गाण्यावर काजोलने केलेला डान्स सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिची या गाण्यावरील डान्सची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.


काजोलचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ फार जुना आहे. पण तो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. काजोलने ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमाच्या एका भागात हजेरी लावली होती. दरम्यान, या कार्यक्रमाचे परिक्षक तुषार कालिया यांच्यासोबत तिने ‘बाजीगर’ मधील ‘ये काली काली आंखे’ या गाण्यावर डान्स केला होता.

हा व्हिडिओ काजोलच्या फॅनपेजवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काजोलने ५ ऑगस्ट रोजीच आपला वाढदिवस साजरा केला. हा व्हिडिओ तिच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यामुळे काजोलच्या डान्सची पुन्हा एकदा चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Leave a Comment